scorecardresearch

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

प्रसिद्ध आदिवासी कार्यकर्ते आणि वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत कुलसंगे विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसले आहेत.

Name Case Gondwana University
गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार (image – लोकसत्ता टीम)

गोंडवाना विद्यापीठातील सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी प्रसिद्ध आदिवासी कार्यकर्ते आणि वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत कुलसंगे विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसले आहेत.

हेही वाचा – नागपूर शिक्षक मतदारसंघात मविआ विरुद्ध वंचित, सेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा – नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर कारवाई करा, लहू सेना आक्रमक

वसंत कुलसंगे हे एक निष्ठावंत ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि गेल्या अनेक वर्षांपासून वीर बाबुराव शेडमाके यांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा प्रसार करण्यात ते सक्रिय आहेत. कुलसंगे यांनी विद्यापीठाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाच्या अधिसभेने आदिवासी क्रांतिकारक, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. हा जिल्ह्यातील जनतेचा अपमान आहे. हा ठराव तात्काळ रद्द करून सभागृहाला शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे. यासाठी त्यांनी २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सोबतच त्यांना विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने नामकरण प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:24 IST