प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नागपूरकडून शहरातील तीन आसनी सीएनजी- पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या ऑटोरिक्षांना प्रती कि.मी. मीटरचे भाडे १५ जून २०२२ रोजी निश्चित करून दिले गेले आहे. त्यानंतरही येथील ऑटोरिक्षांचे ‘मीटर डाऊन’ असल्याने प्रवाशांची अव्वाच्या सव्वा भाडे आकारून लूट सुरू आहे. आता प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि वाहतूक पोलीस एकत्र येऊन या ऑटोरिक्षांवर कारवाई करणार आहे.

हेही वाचा- नागपूर : बाळविक्रीसाठी तोतया डॉक्टरांची टोळी; रुग्णालये, परिचारिकाही बनावट

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे (आरटीओ) शहरातील ऑटोरिक्षा चालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे देशभरातून शहरात विविध कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांची जास्त भाडे आकारून लूट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नागपूरकडून १६ जून २०२२ रोजी तीन आसनी सीएनजी-पेट्रोल इंधन वापरणाऱ्या ऑटोरिक्षांसाठी सुधारित म्हणजे प्रती कि.मी. १८ रुपये आणि दीड किलोमीटरसाठी २७ रुपये निश्चित करून देण्यात आले आहे. यावेळी विविध ऑटोरिक्षा संघटनांशी समन्वय करून सगळ्या ऑटोरिक्षांमध्ये मीटर बसवून पुढे त्यानुसारच प्रवासी वाहतूक करण्यासाठीही आवाहन केले गेले. त्यानंतरही बहुतांश ऑटोरिक्षा चालक आजही मीटरनुसार धावत नाही.

हेही वाचा- नागपूर:‘भारतीय विज्ञान काँग्रेस’चा हिशोब नेमका कुणाकडे? विद्यापीठ म्हणते, ३१ मार्चनंतर माहिती देऊ

आरटीओकडे तक्रारी आल्यानंतर आता या ऑटोरिक्षा चालकांना धडा शिकवण्यासाठी आरटीओ नागपूर शहर, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांनी एकत्र येत पुढे कारवाईचे नियोजन केले आहे.

विनामीटर धावणाऱ्या ऑटोरिक्षांची तक्रार करा

आरटीओकडून नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३३३८८ यावर विनामीटर धावणाऱ्या ऑटोरिक्षांची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऑटोरिक्षांवर आरटीओकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर रवींद्र भुयार यांनी सांगितले.