नागपूर : द्वेषमूलक भाषणे, वक्तव्य करून समाजत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या होत असल्याने जागरूक नागरिक व्यथित झाले आहे. त्यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाजवळ एकत्र येत प्रेम व शांतता संदेश दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे शांततेचे, प्रेमाचे आणि सलोख्याचे राज्य होते. त्यांनी कधीही धर्मधर्मात व माणसा-माणसात भेद केला नाही. पण सध्या धर्म द्वेषाचा उन्माद, भय, असुरक्षितता, ताण-तणाव अशा स्थितीत आपण सगळे वावरत आहोत. दहशतीचे सावट सर्वत्र पसरवले जात आहे. महागाई, बेकारी, शिक्षण आणि आरोग्य या सारख्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष इतरत्र वळवून धर्माच्या नावाने तरुणांची माथी भडकावली जात आहेत. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र दिनी महालमधील शिवजी महाराजांच्या पुतळयाजवळ जागरुक नागिरकांनी एकत्र येऊन हातात पांढरे कापड, पांढरा कागद तसेच पांढरे कपडे घालून शांतीचा संदेश दिला.
पांढरा रंग हा शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे, असे आम्हाला वाटते, असे सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ वाघमारे म्हणाले. या शांती संदेश उपक्रमात सुजात भोंगाडे, उज्ज्वला तट्टे, ज्योती निचळ, सरिता जुनघरे, पूनम जोगराना, रीना पगारे, अश्विनी भारद्वाज, स्मिता गलगले, कुमुद काम्बले, शालू चिकटे, आरती बोरकर, जोत्स्ना कांबळे, रोशनी गंभीर, प्रीती वाघमारे, योगिता मंचमवार, अर्चना कोटट्टेवार, वंदना वनकर, विलास भोंगाडे, दीनानाथ वाघमारे, उमेश कोर्राम, राजेंद्र बढिम्ये, महेंद्र तारनेकर, रोहित भगत, डॉ प्रकाश तोवर, धीरज भिसिकर, शंकर पुंड, धर्मपाल शेंडे, रामभाऊ निचळ, रामा जोगराना, अनंत अहमदाबादकर, रविन्द्र देवघरे सहभागी झाले होते.