scorecardresearch

अयोध्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातील १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड पाठवणार

२९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा, उत्तरप्रदेश मधील मंत्री सहभागी होणार

Ayodhya will send 1800 cubic meters of teak wood
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चंद्रपूर: अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे. २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकार मधील तीन कॅबिनेट मंत्री तथा अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजप नेते तथा राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार २२ मार्च  रोजी सकाळी गगांधी चौक येथे गुढीपूजन व १ कोटी रामनाम जाप लिखाण पुस्तिकेचे वितरणाची सुरुवात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आली.  याप्रसंगी ते बोलत होते. रामनाम जापाच्या या पुस्तिका अयोध्या येथील नवनिर्मित राम मंदिरासाठी लोकनेते मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथून पाठविण्यात येणाऱ्या काष्ठ(सागवान)पूजन प्रसंगी २९  मार्चला प्रभू श्री रामाला समर्पित केल्या जातील.

हेही वाचा >>> खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!

या पूर्वी चंद्रपूरकरांनी मोठया प्रमाणात,अयोध्या मंदिरासाठी रामशिला पाठविल्या होत्या.आता १ कोटी रामनाम जापाचे लिखाण करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी रामभक्तांना  हिंदू नववर्षाच्या शुभारंभ प्रसंगी प्राप्त होत आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. २९ मार्च रोजी सागवान लाकूड ची मिरवणूक बल्लारपूर येथील वन विभागचे डेपोतून निघणार आहे. ही भव्य शोभायात्रा चंद्रपुरात दाखल होऊ. सायंकाळी चांदा क्लब ग्राउंड येथे प्रसिद्ध गायक कैलाश खेर याचे भक्ती संगीतचा कार्यक्रम होईल अशीही माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 13:28 IST

संबंधित बातम्या