लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू महायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभेत बच्चू कडूंनी २० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या मुंबईत बैठकही आयोजित करण्यात आली आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

उद्या मुंबईत पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. या बैठकीला पक्षाचे राज्यातील २० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आगामी विधानसभा निवडणूक कशाप्रकारे लढवायची याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. येत्या विधानसभेत महाविकास आघाडीबरोबर जायचं की महायुतीबरोबर थांबायचं की स्वतंत्र लढायचं याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्ही २० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितलं.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Maharashtra Live Updates
Maharashtra News Updates : अखेर धारावीकरांनी बंद पाडले अदानीचे सर्वेक्षण, अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड उद्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार
UddhavThackeray
भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
dhananjay munde pankaja munde beed news
बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “या सगळ्या पराभवाची जबाबदारी…”
uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान

राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवावीच लागेल

यावेळी महायुतीत बरोबर असतानाही २० जागा लढवणार का? असा प्रश्न विचारला असता, महायुतीत असलो तरी याचा अर्थ आम्ही निवडणूक लढवू नये, असा होत नाही. एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, निवडणूक लढवणं हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मुख्य उद्देश असतो, त्याशिवाय राजकारण पूर्ण होत नाही, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या २० जागांवर निवडणूक लढवू

दरम्यान, या २० जागा या केवळ विदर्भातल्या असतील की संपूर्ण महाराष्ट्रातल्या, असं विचारलं असता, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या २० जागांवर निवडणूक लढवू, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही

पुढे बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तार झाला, तरी मला मंत्रीपद मिळणार नाही आणि त्यांनी मला मंत्रिपद दिलं, तरी मी ते घेणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.