लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू महायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभेत बच्चू कडूंनी २० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या मुंबईत बैठकही आयोजित करण्यात आली आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

उद्या मुंबईत पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. या बैठकीला पक्षाचे राज्यातील २० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आगामी विधानसभा निवडणूक कशाप्रकारे लढवायची याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. येत्या विधानसभेत महाविकास आघाडीबरोबर जायचं की महायुतीबरोबर थांबायचं की स्वतंत्र लढायचं याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्ही २० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bacchu kadu announce to contest 20 seats in vidhansabha election spb