वाशिम : सरकारने मला दिव्यांग मंत्रालय खाते दिले. मात्र, हे खाते केवळ नावापुरतेच शिल्लक आहे. ना कुठली गाडी, ना घोडी, ना कोणतेही अधिकार. मात्र समाधान याचे आहे. की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या अडचणी समजून घेऊन येणाऱ्या काळात दिव्यांगाचे दुःख कमी करून तुमच्यासाठी लढत राहील, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी केले.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज ४ ऑक्टोबर रोजी तिरुपती लॉन येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगासाठी पाच टक्के निधी खर्च होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक दिव्यांग घरकुल व विविध योजनेपासून वंचित राहतात. श्रीमंत अंत्योदयचे लाभार्थी आहेत तर दिव्यांग माणूस योजनेपासून कोसो दूर आहे. हे सरकारचे अपयश आहे, असे कडू म्हणाले.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/cats_ee077e.jpg
“हा नवा भारत आहे, घुसून मारतो”, योगींचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता फटाके फुटले तरी…”
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
after germany us reacts to arvind kejriwal s arrest
अन्वयार्थ : अस्थानी त्रागा..

हेही वाचा – आदिवासी विकास मंत्र्यांची गाडी अडवली, नागपुरात आंदोलकांची मागणी काय पहा..

हेही वाचा – बुलढाणा: पितृपक्षासाठी ‘ती’ माहेरी आली, पती अगोदर परतला; मात्र तिला काळाने गाठले…

आमदार खासदार गठ्ठा मतदार शोधून त्यांना वेळ देतात. त्यांचे लग्न, बारसे करतात आणि आपली मते पक्की करतात. कारण त्यांची मते त्यांना हवी असतात. परंतु दिव्यांग व्यक्तीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. परंतु दिव्यांगाची ताकद आता दिसली पाहिजे. सरकारने दिव्यांग मंत्रालय खाते माझ्याकडे दिले. परंतु हे पद केवळ शोभेची बाब आहे. ना कोणते अधिकार आहेत, ना निधी. परंतु मी २५ ऑक्टोंबरपर्यंत राज्य पिंजून काढणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने दिव्यांगासाठी भरीव कार्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असेही कडू म्हणाले.