अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला, ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. कुसुमाग्रज म्हणायचे, ‘भाषा मरत असली की देशही मरत असतो.’ आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे. जी भाषा बोलणाऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले, ती भाषा तुम्ही सभागृहात बोलले पाहिजे. जेणेकरून देशातील सामान्य माणसाला ती भाषा, तो अर्थसंकल्प समजला पाहिजे. म्हणून पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा हिंदीतून सादर झाला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>केसीआर यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, ‘बीआरएस’ गडचिरोलीतून लढणार विधानसभा; माजी आमदार लागले गळाला

बच्‍चू कडू म्‍हणाले, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी समाधानकारक आहेत. पण यामध्ये कोट्यवधी शेतकरी, बेघर, मजूर सुटले आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम होईल, असे या यातून वाटत नाही. या सर्व गोष्टींचा विचार अर्थसंकल्पामध्ये व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा >>>आमदाराने मध्यरात्री छापा टाकत उघडकीस आणली वाळू तस्करी, वाचा कधी आणि कुठे ते…

भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी या देशाच्या संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. या देशाची भाषा इंग्रजी नाही आणि उद्या राज्याचा अर्थसंकल्प आम्ही हिंदीतून मांडला तर काय होईल, असा सवाल त्यांनी केला. संसदेत केलेल्या भाषणातील शब्द थेट जनतेला जाऊन भिडले पाहिजे. पण तसे झाले नाही. अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर करण्यात आला. त्याची दुरुस्ती सरकारने केली पाहिजे. हिंदी भाषा बोलता येत नसेल, तर हिंदी बोलणाऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करा. नाहीतर माफी मागून इंग्रजी बोला. कारण आम्ही राष्ट्रप्रेमी लोक आहोत. त्यामुळे लोकसभेमध्ये झालेल्या प्रकाराची सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachu kadu bitterly displeased with presenting the budget in english mma73 amy
First published on: 01-02-2023 at 20:06 IST