नागपूर : महापालिकेच्या १२९ बँक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बँकेच्या संचालक मंडळाने १ जुलै २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आक्षेप घेतल्यानंतर संचालक मंडळाने त्यातून मार्ग न काढता थेट निवृत्ती वेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश निवृत्तीवेतनधारक निवृत्ती वेतनाच्या भरवशावर आहेत.महापालिका कर्मचारी सहकारी बँकने जून महिन्यात सर्व १२९ निवृत्ती वेतनधारकांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी १ जुलै २०२५ पासून पेंशन बंद करण्याची माहिती दिली.
आरबीआयने निवृत्ती वेतनाच्या निधीबाबत लेखा-परीक्षणात आक्षेप घेतला आहे. आरबीआयच्या निर्देशानुसार निवृत्ती वेतन बाबत तरतूद करणे सद्यस्थितीत शक्य नाही, असा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर १३ मे आणि १ जूनला संचालक मंडळाच्या बैठकीत १ जुलैपासून निवृत्ती वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, नागपूर महानगर पालिका कर्मचारी सहकारी बँक लि., नागपूर २१ जुलै १९३४ रोजी सहकारी संस्था कायदा, १९६० अंतर्गत नोंदणी क्र. ३०३ असलेली नागपूर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पत संस्था नागपूर अस्तितवात आली, ०१ जून १९९५ ला संस्थेचे रूपांतर बॅकेत रूपांतरीत झाले.
नागपूर महानगर पालिका कर्मचारी सहकारी बँक लि., कोठी रोड, महाल, नागपूर येथे आहे, बँकेकडे ४ शाखा आणि मुख्यालय आहे. महाल ला मुख्यालय तसेच मुख्य शाखा, नंदनवन, पाचपांवली, सिव्हिल लाईन येथे शाखा आहेत.
बॅकेचे ४८४१ सदस्य आहेत व सर्व सदस्य हे म.न.पा. सेवेत कर्मचारी म्हणुन कार्यरत आहेत, दि. ३१/०३/२०२१ पर्यंत बँकेचे एकुण भागभांडवल १२४०.८२ लाख आहे.
नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेचे कर्मचारी म्हणजे बँकेचे कामकाज पाहणारे आणि बँकेच्या विविध विभागांमध्ये काम करणारे लोक. बँकेचे कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी ते काम करतात. बँकेचे कर्मचारी लोकांकडून ठेवी स्वीकारतात आणि गरजू लोकांना कर्ज देतात. ते बँकेतील विविध व्यवहार जसे की पैसे जमा करणे, काढणे, हस्तांतरित करणे इत्यादी कामे पाहतात.बँकेचे कर्मचारी ग्राहकांना बँकेच्या योजना, खाते उघडणे, कर्ज प्रक्रिया इत्यादींविषयी माहिती देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात.बँकेचे व्यवस्थापन, खातेवाटप, अहवाल तयार करणे, इत्यादी कामेही कर्मचारी करतात.
बँकेचे कर्मचारी बँकेच्या नियमांनुसार आणि कायद्यानुसार काम करतात. कर्मचाऱ्यांना बँकेच्या नियमांनुसार काम करण्याची आणि बँकेच्या हिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी असते.त्यांना बँकेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे आणि बँकेची प्रतिमा जपण्याची जबाबदारी असते.कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगले वागणे, सहकारी कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आणि बँकेच्या कामकाजात पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी:नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.