scorecardresearch

नागपूर : वैदर्भीय जितेशची भारतीय संघात निवड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० खेळणार…

विदर्भ क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्माचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Jitesh Sharma selected in Indian cricket team
अमरावती शहरात जन्मलेल्या जितेशने २०१३-१४ साली विजय हजारे चषकात विदर्भाच्यावतीने ‘अ’ दर्जाच्या सामन्यात पदार्पण केले.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्माचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार असून त्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Asian Games 2023 Updates
Asian Games: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पटकावले सुवर्णपदक, अफगाणिस्तानला खराब रॅकिंगचा बसला फटका
India's milestone of 100 medals complete in 19th Asian Games 2023
Asian Games: भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, टीम इंडियाने पूर्ण केले पदकांचे शतक
Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?
IND W vs BAN W: Indian women's cricket team secure medal at Asian Games defeated Bangladesh by eight wickets in semi-final
IND W vs BAN W: एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पदक केले निश्चित, उपांत्य फेरीत आठ विकेट्सने बांगलादेशला चारली धूळ

अमरावती शहरात जन्मलेल्या जितेशने २०१३-१४ साली विजय हजारे चषकात विदर्भाच्यावतीने ‘अ’ दर्जाच्या सामन्यात पदार्पण केले. २०१५-१६ साली रणजी ट्रॉफीमध्ये जितेशचे पदार्पण झाले. २०१६ मधील आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सकडून जितेश खेळला होता.त्यानंतर जितेशने पंजाब किंग्स संघातर्फे आयपीएलमध्ये फलंदाजीत चमक दाखवली.

आणखी वाचा-ताडोबा प्रशासनाचे आवाहन; म्हणाले, ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आळा घाला

जितेशने आजवर शंभर टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये दोन हजारांच्यावर धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेतही भारतीय संघात समाविष्ट जितेश उत्तम खेळाचे प्रदर्शन करणार अशी अपेक्षा क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Batsman and wicket keeper jitesh sharma selected in indian cricket team for the five t20is against australia tpd 96 mrj

First published on: 21-11-2023 at 22:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×