नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही ते म्हणाले.
नागपूर येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते, ते म्हणाले, निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रवादीला ओबीसी समाजाची आठवण आली. भाजपाने मोदी यांना पंतप्रधान करून ओबीसी समाजाला न्याय दिला. केंद्रात ओबीसी समाजाचे २७ मंत्री आहेत. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या काळातच ओबीसींचे मंत्रालय स्थापन झाले. दुसरीकडे महाविकास आघाडी
ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bawankule reply to ncp on the allegation that obc leaders are being sidelined bjp cwb 76 ysh