नागपूर : कर्नाटक सरकार हाय हाय.. ईडी सरकारचा धिक्कार असो, ५० खोके एकदम ओके, माजले बोके, अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी विधान भवन परिसर दणाणून सोडला परिसर विधिमंडळ अधिवेशनाच्या  पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्र द्रोहाला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह महाआघा़डीचे सर्व आमदार सहभागी झाले होते. ५० खोके एकदम ओके, असे फलक विरोधी पक्षाच्या आमदारांनी हाती घेतले होते. यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अशोक चव्हाण राजेश टोपे, एकनाथ खडसे, अंबादास दानवे, नाना पटोले यांसह इतर आमदार उपस्थित होते.

Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’
Dhangar reservation
धनगर आरक्षण तांत्रिक बाबीमध्ये : आमदार गोपीचंद पडळकर
decision of cm Eknath Shinde about parvati Constituency was annulled by the High Court as illegal and arbitrary
पुणे : शिंदे सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा
Petrol Price in states
महाराष्ट्राच्या तुलनेत भारतातील कोणत्या राज्यात स्वस्त मिळतं पेट्रोल-डिझेल? पाहा खर्चाची आकडेवारी