scorecardresearch

‘आझादी से अंत्योदय तक’ उपक्रमात वर्धा जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी; देशातील दहा जिल्ह्यांत समावेश

केंद्रीय मंत्रालयाच्या सहयोगाने ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने हा उपक्रम देशातील निवडक ७५ जिल्ह्यांत २२ एप्रिल २०२२ पासून राबविण्यात आला.

‘आझादी से अंत्योदय तक’ उपक्रमात वर्धा जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी; देशातील दहा जिल्ह्यांत समावेश
संग्रहित छायाचित्र

वर्धा : केंद्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘आझादी से अंत्योदय तक’ या उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील दहा जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.दहा अन्य केंद्रीय मंत्रालयाच्या सहयोगाने ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने हा उपक्रम देशातील निवडक ७५ जिल्ह्यांत २२ एप्रिल २०२२ पासून राबविण्यात आला.

त्याचा समारोप १५ ऑगस्टला करण्यात आला. सर्व ७५ जिल्ह्यांत विविध सतरा योजना या काळात राबविण्यात आल्यात. त्यानंतर योजना राबविणाऱ्या सर्व जिल्ह्यांत कामाचा आढावा घेतल्या गेला. त्यातून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दहा जिल्ह्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत पुढील काळात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात निवडप्राप्त जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचा सत्कार केला जाणार आहे.

हेही वाचा : गडचिरोली : धान खरेदी घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर ; दरवर्षी संगनमताने होतो कोट्यवधींचा भ्रष्टाचार

देशातील सर्वोत्तम दहा जिल्हे

गाझियाबाद (उत्तरप्रदेश), गुरुदासपूर (पंजाब), कैमुर (बिहार), पुडू कोत्तई (तामिळनाडू), दक्षिण कन्नड (कर्नाटक), नेल्लोर (आंध्रप्रदेश), वेस्ट त्रिपुरा (त्रिपुरा), पेक्योंग (सिक्कीम), वर्धा (महाराष्ट्र) व बेलगावी (कर्नाटक).

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best performance of wardha district in azadi se antyodaya tak initiative covering ten districts of the country tmb 01

ताज्या बातम्या