नागपूर: जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या काम सुरू असल्याने नागपूरहून मुंबई, पुणे आणि नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तीन दिवस रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ३ ते ६ डिसेंबर या काळात पुणे, मुंबई, अहमदाबाद, गोवाचा प्रवास करणार असणाऱ्यांची अडचण होणार आहे. ०११३९ नागपूर -मडगाव एक्स्प्रेस ३ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. १२११४ नागपूर -पुणे एक्सप्रेस, २२१३७ नागपूर- अहमदाबाद एक्सप्रेस, १२१०५ सीएसएमटी- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, ०११४० मडगाव-नागपूर एक्सप्रेस ४ डिसेंबरला धावणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस, १२११३ पुणे-नागपूर गरीब एक्सप्रेस, १२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस, १२१३९ सीएसएमटी- नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, २२१३८ अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस, ११०३९ कोल्हापूर-गोंदिया  महाराष्ट्र एक्सप्रेस, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, १२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस ५ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. तर ६ डिसेंबरला १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>> विदर्भ ही मुख कर्करोगाची राजधानी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द
yavatmal, Running Car, Catches Fire, Nagpur Tuljapur National Highway, Near Kalamb,
नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘द बर्निंग कार’…..

काही गाड्यांचे मार्ग वळवले

बिलासपूर – हापा एक्सप्रेस, हावडा – अहमदाबाद एक्सप्रेस,सेंट्रल – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, पुरी-ओखा द्वारका एक्सप्रेस, पुरी-सुरत एक्सप्रेस, पुरी-गांधीधाम एक्सप्रेस, संत्रागाछी – पोरबंदर कवी गुरु एक्सप्रेस ४ आणि ५ डिसेंबरला बडनेरा जंक्शन-भुसावळ चोरड- खांडवा-इटारसी जंक्शन- भोपाळ जं- रतलाम जंक्शन-छायापुरी मार्गे वळण्यात येणार आहेत.