scorecardresearch

Premium

भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार

गुन्हा दाखल होताच राकेश निखाडे याला अटक करण्यात आली तर संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली व जयश्री कडू या तिघी जणी रात्रीच फरार झाल्यात.

bhandara aromira nursing college institute principal and staff abscond along with trustee after cheating case registered
अरोमिरा नर्सिंग कॉलेजनी विद्यार्थिनींची केली फसवणूक

एक जण अटकेत

भंडारा : अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर काल रात्री अरोमिरा कॉलेजच्या संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली, कर्मचारी राकेश निखाडे व जयश्री कडू यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच राकेश निखाडे याला अटक करण्यात आली तर संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली व जयश्री कडू या तिघी जणी रात्रीच फरार झाल्यात.

हेही वाचा >>> विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध

shivsena pimpri, hou dya charcha campaign, shivsena uddhav thackeray faction, shivsena hou dya charcha in pimpri
पिंपरी-चिंचवडमध्ये आता ठाकरे गटाचे ‘होऊ द्या चर्चा’ अभियान
Court orders Delhi Police to give copy of FIR to Prabir Poklakayastha and Amit Chakraborty
पूरकायस्थ, चक्रवर्ती यांना एफआयआरची प्रत द्या! न्यायालयाचे दिल्ली पोलिसांना आदेश   
OBC agitator ravindra Tonge
ओबीसी आंदोलनकर्ते टोंगे यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने रुग्णालयात हलविले
rukminibai hospital
रुक्मिणीबाई रुग्णालयातील घटनेची अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी; मनसेचे पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग तथा अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पिसाळ यांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर  काल रात्री पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार अरोमिरा कॉलेजच्या संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली, कर्मचारी राकेश निखाडे व जयश्री कडू यांच्या विरोधात भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश निखाडे याला रात्री उशिरा अटक होताच त्याने तब्येतीचा बहाणा केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या संस्था चालक वर्षा साखरे या फरार आहे. राकेश निखाडे फरार होऊ नये म्हणून त्याला दुपारी १ वाजता पासून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र मुख्य आरोपी असलेल्या वर्षा साखरे या सुध्दा फरार होऊ शकतात याची कल्पना असताना भंडारा  पोलिसांनी त्यांना विशेष सुट का दिली असा प्रश्न ही उपस्थित होतोच. आधीच पोलीस विभागाकडून कारवाई करण्यास दिरंगाई झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना पोलीस यापुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhandara aromira nursing college institute principal and staff abscond along with trustee after cheating case registered ksn 82 zws

First published on: 28-09-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×