नागपूर: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करत आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराला तेच जबाबदार असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांना कोणती वागणूक मिळाली याचा संसदेमध्ये खुलासा करण्यासाठी अमित शहा यांच्यामध्ये धाडस नाही, अशी टीकाही राहुल यांनी केली. या पत्रकार परिषदेत नागपूरचा भारत बानाइत उपस्थित होता. २० जुलै रोजी दिल्लीमध्ये झालेल्या लाठी हल्ल्यानंतर भारतचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. या पत्रकार परिषदेत भारतनेही अमित शहांवर प्रखर टीका केली.
काय म्हणाला भारत
आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली म्हणून आमच्यावर इतकी कठोर कारवाई झाली. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती, तर कदाचित गोळी मारली असती, अशी टीका भारतने केली. वीस तारखेला घडलेला संपूर्ण प्रसंग भारत नाही यावेळी सांगितलं आम्ही विद्यार्थी असून देशातील शिक्षण व्यवस्था सुधरावे यासाठी प्रयत्न करत आहोत आम्हाला बोलण्याचा आणि आमचे विचार मांडण्याचाही अधिकार नसेल तर ही कसली लोकशाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत
आपल्यावर हल्ला झाला, मारहाण केली आणि धमक्या दिल्या याची त्यांनी मला माहिती दिली. त्यांनी राज्यघटनेचे संरक्षण केले,ही आमची चूक होती का असेही भारत म्हणाला. तसेच आंदोलना त प्रामुख्याने भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजपच्या आयटी सेल कडून रोल केला जात असून धमक्या दिल्या जात असल्याचे आरोप केला.
राहुल गांधींनी काय टीका केली
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी दिल्लीमधील जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे काही विद्यार्थी आणि आंदोलकांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ या निवासस्थानी राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर राहुल यांनी माध्यमांशी बोलताना अमित शहांवर शाब्दिक हल्लाबोल केला. पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी सांगितले की, “शिक्षण व्यवस्था सदोष, कोसळण्याच्या अवस्थेत असलेली आणि निरुपयोगी शिक्षण व्यवस्थेविरोधात तक्रार करणे गुन्हा नाही, असे राहुल गांधी यावेळी ठामपणे म्हणाले. “ही व्यवस्था बदलण्याची, दुरुस्त करण्याची गरज आहे. हे विद्यार्थी तीच मागणी करत होते. ते कोणतीही हिंसा करत नव्हते, आक्रमक नव्हते किंवा खोडसाळपणा करत नव्हते. त्यांच्याकडे गुंड पाठवून त्यांच्याकडून माफी वदवून घेणे, १५ वर्षांच्या मुलीला माफी मागायला लावणे आणि ती स्वीकारणे हा वेडेपणा आहे आणि आम्हाला मान्य नाही,” अशी टीका राहुल यांनी यावेळी केली.
