scorecardresearch

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामे प्रलंबित’; बावनकुळेंची टीका

बावनकुळे म्हणाले, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच आता फाईलवर पेन चालायला लागला राज्यातील विकास कामे आता मार्गी लागत आहेत.

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामे प्रलंबित’; बावनकुळेंची टीका
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडीचे सरकार असताना विकास कामांच्या फाईलवर सह्या करण्यासाठी अडीच वर्ष पेन बंद होता. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच आता फाईलवर पेन चालायला लागला असून राज्यातील विकास कामे आता मार्गी लागत असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा- गडचिरोली : बधाई हो…! टी-६ वाघिणीने दिला ४ पिलांना जन्म

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या कामात अनेकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस हे सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. ते जनतेच्या हितासाठी १८ तास काम करत आहे. हातात पेन घेऊन असून झटपट निर्णय घेत आहे.

हेही वाचा- एक तासाचा पंतप्रधानांचा दौरा, ७५ हजार कोटीचे प्रकल्प, महामार्ग, रेल्वे आणि मेट्रोही

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्यांना बोलू द्या. हा विषय शेवटी उच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे उगाच चितावणी खोर भाषण करून काही होणार नाही. उच्च न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यावर सुनावणी घेऊन हा वाद संपुष्टाचा आणावा. कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र भडकेल असे वक्तव्य करु नये असेही बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:22 IST

संबंधित बातम्या