scorecardresearch

Premium

‘‘जिस भाई को देसी कट्टा, रिवॉल्वर चाहिए…’’; तरुणाच्या Facebook पोस्टमुळे खळबळ

फेसबुकवरील ही पोस्ट प्रसारित होताच सायबर पोलिसांनी भूपेश मोटघरे याचा शोध घेतला.

bhupesh motghare young man posted facebook regarding sale revolvers
तरुणाच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

भंडारा: “जिस भाई को देसी कट्टा, रिवॉल्वर चाहिए, मेरे नंबर पर तुरंत कॉल करें, मेरा मोबाइल नंबर, व्हॉट्सअ‍ॅप नंबर पर कॉल करें, तुरंत व्हॉट्सअ‍ॅप ओन्ली व्हॉट्सअ‍ॅप ७७२८८७८८३८,” अशी पोस्ट भूपेश मोटघरे नामक एका तरुणाने फेसबुकवर टाकली. सोबत देशीकट्ट्यासह फोटोही टाकला. या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.

फेसबुकवरील ही पोस्ट प्रसारित होताच सायबर पोलिसांनी भूपेश मोटघरे याचा शोध घेतला. भूपेश हा मूळचा पवनी तालुक्यातील अड्याळ येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला गाठले आणि पोस्टबद्दल विचारणा केली असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्याच्या नावाच्या अकाउंटवरून कुणी तरी अशी पोस्ट टाकली, याबाबत तो अनभिज्ञ होता.

tobacco smuggler jaysukh, police seized banned tobacco, tobacco of rupees 7 lakhs, chandrapur tobacco smuggler jaysukh
“जयसुख”ची तंबाखू, गुटखा तस्करी जोरात; ७ लाखाचा गुटखा जप्त
Gaurav More
Video: लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा भन्नाट डान्स, DDLJ मधील शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन
Clash in lalbaug raja ganpati mandap shocking video
Fight Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले
prithvik pratap and Priyadarshini Indalkar dance
Video: पृथ्वीक प्रतापचा कात्रजच्या नयनतारासह शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

हेही वाचा… वादग्रस्त पोस्टप्रकरणी दोघे ताब्यात; गडचिरोली पोलिसांची पुणे-नागपुरात कारवाई

भूपेशने ताबडतोब भंडारा सायबर पोलीस ठाण्यात जाऊन यासंबधी तक्रार केली. आता फेसबुकवरून देशी कट्टा विकणारा हा भूपेश कोण, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यासंदर्भात फेसबुक कंपनीलाही पत्र लिहिण्यात आले असल्याचे भंडारा सायबर पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी सांगितले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhupesh motghare a young man posted on facebook regarding the sale of revolvers ksn 82 dvr

First published on: 21-06-2023 at 20:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×