लोकसत्ता टीम

अकोला : अवैध सावकारी प्रकरणी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत शहरात तीन ठिकाणी शुक्रवारी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या पथकाने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

शहरात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज तीन ठिकाणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ मधील तरतुदीनुसार धाडसत्र राबवण्यात आले आहे. शहरातील सुधीर कॉलनी, जठारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात धाड टाकून शोध मोहीम करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनात तालुका उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण, सहाय्यक निबंधक पथक प्रमुख अभयकुमार कटके, रोहीणी विटनकर, ज्योती मलिये यांच्या पथकाद्वारे एकूण ३३ कर्मचाऱ्यांकडून आज धाड टाकण्यात आली. या धाडीदरम्यान मूळ खरेदीखत दोन, खरेदीखत छायाप्रत तीन, चूक दुरुस्ती लेख छायाप्रत एक, चिठ्‌ठी दोन, रोकडवही दोन, उधारी वही दोन, आडे वही, बँक पासबुक नोंदवही, व्हाऊचर बुक प्रत्येकी एक, व्हाऊचर स्लीप, धनादेश बुक चार, धनादेश सात, ४७ कोर धनादेश, रद्द केलेले चार धनादेश, कोरे लेटर हेड एक, कोरे मुद्रांक सात, प्रतीज्ञालेख एक, सातबारा उतारा चार, आधारकार्ड तीन, बँक पासबुक पाच, संगणक सीपीयू आदी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

आणखी वाचा-एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसने थेट निवडणूक आयोगालाच…

यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या धाडसत्रामध्ये अकोला जिल्हा परिषद कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी पंच म्हणून सहभाग घेतला होता. धाडसत्रातील जप्त दस्तऐवजांची पडताळणी केली जाणार आहे. अवैध सावकारी प्रकरणी प्राप्त तक्रारीची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली. या धाडसत्रामुळे शहरातील अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

आणखी वाचा-काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नाराजी कशामुळे आहे याबाबत मला… पटोले थेटच बोलले…

५४ अवैध सावकारांवर फौजदारी गुन्हे

सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आतापर्यंत अवैध सावकारी अंतर्गत बळकाविलेल्या एकूण १५१.९५ हेक्टर शेतजमिनी संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत १८६ धाडी करण्यात आल्या असून त्यापैकी ५४ अवैध सावकारांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ९२ प्रकरणांची चौकशी सुरु आहे.

Story img Loader