लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर खाली घसरल्यावर पुन्हा दरवाढ झाली होती. मात्र ८ ऑगस्टला सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७० हजाराहून खाली घसरून पुन्हा निच्चांकीवर पोहचले. त्याच्या दोन दिवसानंतरच पुन्हा सोन्याचे दर वाढल्याने दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कुटुंबात चिंता वाढली आहे. दरम्यान सोन्याच्या दरात वारंवार बदलामुळे सराफा व्यवसायावरही परिणाम होत आहे.

नागपुरात लग्न समारंभ, बारसे, साक्षगंधसह इतरही कार्यक्रमात अनेक जण सोने- चांदीच्या भेटवस्तू देत असतात. त्यामुळे येथे सराफा बाजारात सतत कमी- अधिक ग्राहकांची रेलचेल दिसते. त्यातच दोन दिवसांपूर्वी नागपुरातील सराफा बाजारात ८ ऑगस्टला सोन्याचे दर निच्चांकी पातळीवर नोंदवले गेले होते. यादिवसी नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार रुपये नोंदवले गेले.

आणखी वाचा-सावधान! रस्ते वाहतूक मंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्याच गृहशहरात अपघाती मृत्यूचे शतक

दरम्यान दर घसरल्यावर ८ ऑगस्टचे दर गेल्या काही आठवड्यातील निच्चांकी पातळीवर होते. परंतु आता पून्हा सोन्याचे दर वाढत आहे. नागपुरातील सराफा बाजारात १० ऑगस्टला बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम पू्नहा ७० हजार रुपयांवर पोहचले आहे. तर २२ कॅरेटसाठी ६५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे दोनच दिवसांमुळे नागपुरात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८०० रुपये, २२ कॅरेट ७०० रुपये, १८ कॅरेट ६०० रुपये, १४ कॅरेट ५०० रुपयांनी वाढले आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून ही दरवाढ फार कमी असून लवकरच आणखी दर वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना यंदा सोने- चांदीतील गुंतवणूक फायद्याची ठरण्याची शंका असल्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान नागपुरात १० ऑगस्टला प्लॅटिनमचेही दर प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये नोंदवले गेले. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी हे दर ४४ हजार रुपये होते. परंतु एक हजार रुपयांनी दर घसरल्यापासून या दरात काहीही परिणाम झाला नाही.

आणखी वाचा-राष्ट्रवादी नेता पुत्राचे ट्वीट, ‘धन्यवाद, सुधीरभाऊ…’

चांदीच्या दरातही मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात ८ ऑगस्टला चांदीचे दर ७९ हजार ४०० रुपये प्रति किलो होते. हे दर १० ऑगस्टला ८० हजार ९०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपये प्रति किलो वाढ नोंदवण्यात आली आहे.