scorecardresearch

वर्धा : रानडुकरांच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहणारी रानडुकरं आज वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. आज सकाळी आजनसरा  हिवरा मार्गावर या पशूमुळे अपघात घडला.

death 22
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

वर्धा : वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहणारी रानडुकरं आज वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. आज सकाळी आजनसरा  हिवरा मार्गावर या पशूमुळे अपघात घडला. आजनसरा येथील प्रवीण नासरे व एकनाथ भोंडे हे दोघे दुचाकीने प्रवीणच्य आईची भेट घेण्यासाठी बोपापुरला निघाले होते. परत येत असताना हिवरा येथे त्यांच्या दुचाकीला चार रानडुकरांनी धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वडनेर येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एकनाथचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. वडनेर पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे. या मार्गावर पूर्वीही वन्यपशूमुळे दुर्घटना घडल्या आहेत. चालत्या गाडीवर माकडांनी उड्या मारल्याने कित्येक जखमी झालेत. वाहन चालक सतर्क होवून गाडी चालवितात, पण आज रानडुकरांनी डाव साधलाच.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 15:48 IST

संबंधित बातम्या