scorecardresearch

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले, अशी टीका करीत भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडी सेलच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळालेचे पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मध्यप्रदेशाला ओबीसींचे आरक्षण टिकवण्यात यश आले, परंतु महाराष्ट्र सरकारला ते जमले नाही. किंबहुना त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर नव्हतेच. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण गेले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, त्याशिवाय निवडणुका घेऊ नये, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी राजीमाना द्यावा, अशा मागण्या यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष रमेश चोपडे यांनी केल्या.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp agitation obc reservation political mahavikas aghadi amy