bjp maharashtra chief chandrashekhar bawankule hit maha vikas aghadi over upcoming election zws 70 | Loksatta

महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

२०१९ मध्ये विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी बावनकुळे अमरावतीत आले होते.

महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : आगामी काळात महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत त्यांना उमेदवारही मिळणार नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, गुरुवारी येथे केला.

२०१९ मध्ये विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी बावनकुळे अमरावतीत आले होते. त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही, ते आता भाजपमध्ये येत आहेत. आगामी काळात आघाडीतील मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे आघाडीत कुणी शिल्लक राहणार नाहीत. तत्कालीन आघाडी सरकारने वैधानिक मंडळे बंद करून विकास थांबवला होता. ती मंडळे आमच्या सरकारने पुन्हा सुरू केल्याने विकासाचा अनुशेष भरून निघेल. आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ व विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकू, असा दावा करतानाच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे दिवस संपल्याची टीका केली. सुप्रिया सुळे यांना आता शरद पवारांच्या नावानेही मते मिळणार नाहीत, असाही दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीला संपवण्याचे काम थेट बारामतीमधूनच सुरू झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, भाजपची काय तयारी आहे? यावर बोलताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा दाखला देत बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला ५१ टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा केला.

मंत्रिमंडळ विस्तार, ‘ईडी’ चौकशी आणि पंकजा मुंडेंबाबत भाष्य टाळले

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे. ते अस्वस्थ आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी विस्तार केव्हा होईल, या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र टाळले. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या संदर्भातही बोलण्यास त्यांनी नकार दिला. महाविकास आघाडीतील काही नेते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची ‘ईडी’मार्फत होणारी चौकशी का थांबली? या प्रश्नावरही स्पष्ट बोलण्याचे त्यांनी टाळले. ‘ईडी’ स्वतंत्र यंत्रणा आहे, यंत्रणेचे अधिकारी निर्णय घेतात, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हिरकणी उद्योगाच्या नावे ५,३०० महिलांची ३२ लाखांनी फसवणूक ; चौघांवर गुन्हा दाखल, प्रत्येक महिलेकडून घेतले ६२० रुपये

संबंधित बातम्या

ओबीसींना तत्काळ आरक्षण देण्याचा अधिकार मला नाही; हंसराज अहिर
“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
प्रतिभावंत चरित्रकार ‘धनंजय कीर’
नागपूर : ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला १४ आणि १५ ऑगस्टला नागरिकांसाठी खुला
नागपूर : साहित्यिक संमेलनात फक्त भाडे वसूल करायला येतात – डॉ. सुधीर रसाळ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हैद्राबादच्या निजामाची महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत