नागपूर : वाझे खोटे बोलत असतील तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा नार्को टेस्टसाठी सामोरे गेले पाहिजे. केवळ आरोप करु नये, असे प्रतिउत्तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांना दिले. चंद्रशेखर बावनकुळे रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले वाझे खोटे बोलत असेल तर जनतेला नार्को टेस्टमधून कळू द्या,देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याऐवजी देशमुख यांनी स्वत: आपण, मी नार्को टेस्टला तयार आहे, असे सांगितले पाहिजे.केवळ आरोप प्रत्यारोप करू नये. चौकशी मागा आणि त्याला समोर जा, असा सल्ला त्यांनी देशमुख यांना दिला. हेही वाचा.अकरावीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही उपद्रव करण्याची गरज नसून ते प्रामाणिक काम करत आहे. अनिल देशमुख जेलमधून बाहेर आल्यानंतर निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी ते आरोप करत असतील तर त्यांच्या अंगावर हे प्रकरण उलटणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट असली तरी त्यात गैर काय आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही आम्हीही सरकारला आमच्या मतदार संघाच्या विकास कामासाठी भेटलो होतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही दिवसात मुंगेरीलाल के हसिन स्वप्न बघत आहे. महाविकास आघाडी ही भंगार कंपनी आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या नेत्यांची कितीही बदनामी केली तरी जनतेला माहित आहे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारची आवश्यकता आहे. हेही वाचा.नागपूर: परीक्षेला जाताना तरुणी अपघातात ठार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण तुम्ही औरंगजेबाच्या वृत्तीत आले आहे. धर्माचे आणि मताचे राजकारण करायला लागले आहे. तुम्हाला मानसिक आजार झाला आहे. त्यांना नागपुरातील पागलखाना रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे. सकाळच्या भोंग्याने विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी तर पुढचे भाषण विकासावर केले पाहिजे मात्र पण त्यांनी राज्यात काहीच विकास केला नाही त्यामुळे त्यांना विकासचे भाषण येत नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरे खोटारडे आहे. २४ महिन्यात दोन दिवस मंत्रालयात जाणारा आणि पेन नसलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रूपाने राज्यातील जनतेने बघितला आहे अशी टीका त्यांनी केली. हेही वाचा.Shravan 2024: श्रावण मास, श्रावणी सोमवार आणि शिवामूठ…नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या… लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली जात असताना त्यात विरोधकांच्या घरातील काय जात आहे, लाडकी बहीण मध्ये जनतेला पैसे मिळणार असेल तर ते पैसे उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत यांच्या घरातून जाणार नाही. जनतेचा पैसा आहे, माझे त्याला समर्थन आहे. कितीही पैसे लागले तरी सरकारने मागे पाहू नये. शेतकऱ्यासाठी जे लागेल ते द्या. एक रस्ता कमी झाला तरी चालेल पण जनतेला पैसे कमी देऊ नये असेही बावनकुळे म्हणाले.