अकोला : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे.पी. नड्डा १४ जून रोजी अकोला शहरात दाखल होणार आहेत. शहरात जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाध्यक्ष नड्डा १४ जूनला अकोल्यात जाहीर सभेला संबोधित करतील.

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणाऱ्या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत. खा. नड्डा यांची प्रथमच अकोल्यात सभा होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी खा. संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. एक लाख नागरिकांच्या उपस्थितीत ही सभा होणार असल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.

vikas Thackeray
गडकरींच्या विरुद्ध लढणारे ठाकरे पवारांच्या भेटीला
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
gathering of wrestlers pune
मी काही स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला आलो नाही : अजित पवार
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…