अकोला : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे.पी. नड्डा १४ जून रोजी अकोला शहरात दाखल होणार आहेत. शहरात जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाध्यक्ष नड्डा १४ जूनला अकोल्यात जाहीर सभेला संबोधित करतील.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणाऱ्या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president j p nadda on 14th in akola in the background of elections ppd 88 ysh