नागपूर : माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणातून वाचविण्याचे काम महायुती सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील करीत आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी करुन राज्यातील महायुती सरकारला घरचा आहेर दिला. वळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते आहे हे येथे उल्लेखनीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांच्या विरोधात आशीष देशमुख यांनी मंगळवारी
जिल्ह्यातील पिडीत शेतकरी व सावनेरमधील खातेदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यामार्फत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद यावेळी आशीष देशमुख म्हणाले, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आमदार सुनील केदार हे जुने मित्र आहेत. त्यामुळे बँक घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्या प्रकरणी मंगळवारी मुंबईत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

हेही वाचा…नागपूर : ‘ॲट्रोसिटी’ची ८० टक्के प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित… आता सर्व सरकारी वकिलांना…..

सुनील केदार हे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या विरोधात वक्तव्य करीत आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँकेत १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी केदार याना ५ वर्षाची शिक्षा झाली असून त्यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सहकार खात्याकडे सुनावणी होणार होती मात्र ती रद्द करण्यात आली आहे. केदार यांना या प्रकरणात दिलीप वळसे पाटील वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

हेही वाचा…चंद्रपूर : गडचांदूर बसस्थानकासमोर दुकानात ‘बॉम्ब’? परिसरात खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

२ ऑगस्टपासून आंदोलन

शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह वसूल करून २ महिन्यात पीडित शेतकऱ्यांना ते वापस करण्याची मागणी देशमुख यांनी केली असून ते न झाल्यास या विरोधात २ ऑगस्ट पासून सावनेरमध्ये पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याबाबत त्यांनी एक निवेदन दिलीप वळसे पाटील यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्याचे १५३ कोटी आणि व्याजाचे १४४४ कोटी वसुली करायचे आहे, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, ओमप्रकाश कामडी आणि अनेक शेतकरी उपस्थित होते. आशीष देशमुख यांनी केलेल्या आरोपामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.देशमुख यांचा हा आरोप महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीवर (अजित पवार) असून यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s ashish deshmukh accuses minister dilip walse patil of shielding sunil kedar in nagpur cooperative bank scam vmb 67 psg
Show comments