छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेते पदावर आहे. त्यामुळे ते शरद पवारांकडे आपले गुण वाढवण्यासाठी त्यांना जाणता राजा संबोधत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा- ‘महापुरुष म्हणून हेडगेवार, गोळवलकर ही नावे स्थापित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न’; सुषमा अंधारे यांची टीका

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
dombivli marathi news, dombivli varun sardesai marathi news
“श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ”, शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी

बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांच्या कामाबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र या जगामध्ये फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने केलेले आंदोलन उत्स्फूर्तपणे झाले. त्यांनी संभाजी राजे हे धर्मवीर नाही असे वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्राची जनता पेटून उठली.

हेही वाचा- नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाचा गाणारांना पाठिंबा? चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जे काही होत आहे ते योग्यच आहे. ते स्टंटबाज आहेत. आपल्या मतदारसंघातील राजकारण जिवंत ठेवण्यासाठी वदग्रस्त वक्तव्य करत राहतात. त्यासाठी ते महाराष्ट्राच्या इतिहासालाही बदलून टाकतात. हिंदुत्वाचा विचार मांडणारा वर्ग कधीच आव्हाडांचे समर्थन करू शकत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.