नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेसला दणदणीत यश मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पक्षातील स्थान अधिक भक्कम झाले असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र निवडणूक निकालाने धक्का दिला आहे.

पटोले आणि बावनकुळे हे दोन्ही नेते वैदर्भीय आहेत. जातीय राजकारणाचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून या नेत्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या काही वर्षांपासून ओबीसी हा मुद्दा राजकीय पटलावर अग्रक्रमाने येऊ लागला आहे. ओबीसी समाजात राजकीय जागरूकता मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे.

AAP Delhi MLA Kartar Singh Tanwar joined BJP
दिल्लीत पाणी तुटवडा, मुख्यमंत्री अटकेत आणि पक्षाला गळती; आप आमदाराने सोडला पक्ष
Nana Patole
“लपवाछपवीची मॅच नाही, ७० दिवसानंतर खरी…”, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
Key takeaways from PM Modi replies in Parliament
हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?
Praniti Shinde, Assembly,
प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
kiran choudhry joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश
Lok Sabha Zilla Parishad Chairman to MP Smita Wagh
नव्या लोकसभेचे नवे चेहेरे: जिल्हा परिषद अध्यक्ष ते खासदार…, स्मिता वाघ ,जळगाव, भाजप
BJP MLA are worried about Congress increasing voter in loksabha election
काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत, मात्र काँग्रेसमध्ये…
Akkalkot Congress presidents shankar mhetre threat warning to BJP MLA Sachin Kalyanshetty
अक्कलकोट काँग्रेस अध्यक्षाचा आमदार सचिन कल्याणशेट्टींना धमकीवजा इशारा

आणखी वाचा-वर्धा : ‘या’ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, कोण बचावले जाणून घ्या…

हा समाज बहुसंख्य असल्याने तो ज्या पक्षाकडे जाईल तो पक्ष सत्तेत येण्याची शक्यता अधिक, असे चित्र आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी चळवळ अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येते. विशेषत: विदर्भातील पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघात ओबीसींच्या जाणिवांचे पडसाद उमटले. या दोन्ही मतदारसंघात विदर्भात काँग्रेसला मोठा विजय मिळाला.

नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघात माजी महापौर संदीप जोशी यांचा पराभव अॅड. अभिजीत वंजारी यांनी केला. या मतदारसंघावर केंद्रीय नितीन गडकरी यांनी वर्चस्व निर्माण केले होते. ते केंद्रात गेल्यानंतर माजी महापौर अनिल सोले यांनी देखील हा गड राखला होता. परंतु संदीप जोशी विरुद्ध अभिजीत वंजारी असा सामना झाला. तेव्हा काँग्रेसने ओबीसी कार्ड खेळले. आधीच अस्वस्थ असलेला ओबीसींमधील सुशिक्षित वर्गावर ही मात्र लागू पडली व अॅड. वंजारी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

आणखी वाचा-पुणे, मुंबईत ओबीसी वसतिगृहांना इमारती मिळेना, जाणून घ्या कारण…

त्यानंतर अमरावती आणि नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघातही असेच निकाल आले. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व नाना पटोले करीत होते. या निकालानंतर भाजपने चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेश अध्यक्ष केले. मात्र, त्याचा लोकसभा निवडणुकीत पक्षाला फायदा झाल्याचे दिसून येत नाही. विदर्भात पक्षाला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. विदर्भात ओबीसी समाजाची संख्या अधिक आहे.

तेली, कुणबी आणि माळी समाजाच्या मतांवर लोकसभा किंवा विधानसभेतील गणित बदलले जाऊ शकतात. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला आला. याचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी मतांच्या भरवशावर प्रतिस्पर्धी उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभूत केले. विदर्भातील इतरही मतदारसंघात अशीच स्थिती आहे.

आणखी वाचा-कृषी विकासासाठी यंदा ३०२ शिफारस! राज्यातील चारह कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक

काँग्रेसने महाराष्ट्रात एका जागेवरून थेट १३ जागांवर मुसंडी मारली. भाजपची २३ जागेवरून सात जागेवर पिछेहाट झाली. भाजप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी असले तरी पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची कामगिरी सरस ठरली तर पक्षाची पिछेहाट झाल्याने बावनकुळे यांच्या नेतृत्वावरच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील दमदार कामगिरीनंतर पटोले यांच्यासाठी पक्षात मोठी संधी निर्माण झाली आहे.