scorecardresearch

‘सध्या टी-२० ची मॅच सुरू असून विरोधक बावचळलेत’; ग्रामपंचायत निकालावरून भाजपा प्रदेशाध्यक्षांची महाविकास आघाडीवर टीका

बावुकुळे म्हणाले, संपूर्ण निकाल येतील तेव्हा ३ हजार ग्रामपंचायती भाजपच्या असतील तर १ हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या असतील

‘सध्या टी-२० ची मॅच सुरू असून विरोधक बावचळलेत’; ग्रामपंचायत निकालावरून भाजपा प्रदेशाध्यक्षांची महाविकास आघाडीवर टीका
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (संग्रहित छायाचित्र)

राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा ग्रामपंचायतींचे निकाल आज लागणार आहेत. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आत्तापर्यंत काही ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निकालावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. जवळपास साडेतीन ते चार हजार ग्रामपंचायती भाजप-शिंदे गट जिंकेल. सध्या टी-२० मॅच सुरू आहे अन् विरोधक बावचळले आहेत, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

हेही वाचा- मुंबईत ५५०० आशा सेविकांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण २३६ पैकी २३१ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक झाल्या त्याची आज मतमोजणी आहे . त्यासाठी ७६१ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे . तर याच २३१ ग्रामपंचायत मध्ये एकूण २०५४ सदस्यांसाठी एकूण ४८९१ उमेदवार रिंगणात आहे. २३६ पैकी ५ ग्रामपंचायत या बिनविरोधी झाल्या आहेत. 

ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या १ हजार ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. १४० ग्रामपंचायती बाळासाहेबांची शिवसेनेने राखल्या आहेत. काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे. संपूर्ण निकाल येतील तेव्हा ३ हजार ग्रामपंचायती भाजपच्या असतील तर १ हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या असतील, असा विश्वासा बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- Maharashtra Assembly Winter Session: यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही…; सभागृहात जयंत पाटील संतापले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भ-मराठवाड्याचा विकास होत आहे. त्याचा परिणाम आज ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालातून दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील अडीच वर्षे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या, अशी मागणी करीत आहेत. वास्तविक त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा- Maharashtra Assembly Session: ५० आमदार एकदम ओके, घरी बसलेले माजले बोके’; विरोधकांच्या घोषणेला सत्ताधाऱ्यांचे जोरदार प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे भविष्यात ओवेसींसोबतही युती करतील

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आहे. त्यांचे मागील अडीच वर्षांतील वागणे काँग्रेसधार्जिणे आहे. भविष्यात ते ओवेसींसोबतही युती करतील, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 14:26 IST

संबंधित बातम्या