नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे. खरे तर ‘शपथनामा’ नाव देणे हीसुद्धा जनतेची फसवणूकच असून त्यांना या जाहीरनाम्यावर मत मिळणार नाहीत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जाहीर केलेला ‘शपथनामा’ जनतेला मुर्ख बनवणारा आहे. ‘शपथनामे’ जाहीर करुन त्यांना मत मिळणार नाही. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केलेला ‘वचननामा’ राष्ट्र कल्याणाचा आहे तर इंडिया आघाडीचा जाहीरनामा ‘हिंदू नाश’ करणारा आहे. सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे, महाराष्ट्र हिंदू विरोधी, असा जाहीरनामा राहुल गांधी यांचा आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
‘लय फडफड करत होता’; मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Varsha Gaikawad Congress
Maharashtra News : उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर, भाजपाकडून मात्र..
Sharad Pawar On Eknath Khadse join Bjp
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
sharad pawar speech marathi news
“पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली, माफी मागतो”, शरद पवारांचं अमरावतीत जाहीर विधान; म्हणाले, “तुम्हाला एक गोष्ट सांगायला…”

हेही वाचा…खूशखबर…. सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे दरही ३ हजारांनी घसरले

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय केंद्रीय समितीचा

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय घेईल. केंद्रीय समितीने निर्णय केला असेल तर राज्यात आडकाठी केली जाणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी महादेव जानकर यांच्या सारख्या ओबीसी समाजातील नेत्यांवर आरोप केले आहे. तांड्यावर राहून त्यांनी समाजाची सेवा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जानकर यांना हरवा, रेल्वे स्टेशनवर झोपवा, अशा गलिच्छ शब्दात टीका केली. आता जाणकार यांचे समर्थक उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रभर धडा शिकवेल, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा…JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, नागपूरच्या निलकृष्ण गजरेने मारली बाजी…

उद्धव ठाकरे यांना दिवसा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत आहे, त्यांनी महाराष्ट्रात १८ जागा जिंकून दाखवाव्या, असे आवाहन बावनकुळे यांनी दिले. विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असली तरी मुळात त्यांच्यामागे आज जनाधार नाही आणि जनाधार नसलेल्या नेत्याने पंतप्रधानाबद्दल बोलू नये. मुत्तेमवार बोलले तरी कोणी त्याची दखल घेत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.