नागपूर: भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल काहीसा आनंद आणि काहीसा धक्का देणारा सध्या दिसतो आहे. भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात निर्णायक आघाडी घेतली तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या कामठी मतदारसंघात पिछाडीवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहाव्या फेरीअखेर भाजपचे बावनकुळे यांना ५८१५ मते तर कांग्रेसचे सुरेश भोयर यांना ४९८८ मते मिळाली. दहाव्या फेरीत बावनकुळे यांनी आघाडी घेतली असली तरी त्यापूर्वी ते पिछाडीवर होते. एकूण आतापर्यंत सुरेश भोयर यांना २५०३ मतांची आघाडी घेतली आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : राजुरात मतमोजणी थांबवली; कारण…

फडणवीस आघाडीवर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूरमधील दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेश फडणवीस हे या मतदारसंघात चौथ्यांदा विजयी होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या फडणवीस यांनी बाराव्या फेरीअखेर १८ हजार मतांनी आघाडी घेतली. बाराव्या फेरीसह देवेंद्र फडणवीस यांना ५३८६० मते, कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे ३५९५४ मते मिळाली. इतर उमेदवारांनी पुढील प्रमाणे मते मिळाली.

हेही वाचा – वर्धा जिल्हा १०० टक्के भाजपमय? चारही मतदारसंघांत विजयाकडे वाटचालीची चिन्हे

सुरेंद्र डोंगरे १२८५ मते, उषा ढोक ५६ मते, ओपुल तागगाडगे २६४, पंकज शंभरकर ३०, विनय भांगे मते १२२२, विनायक अवचट २७ मते, नितीन गायकवाड २१ मते, मेहमूद खान १८, विनोद मेश्राम ३६, सचिन वाघाडे १०५, नोटा ८२० मते

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule is behind suresh bhoyer of congress is leading cwb 76 ssb