चंद्रपूर :अडीच वर्षाचा एकूणच कारभार बघता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांचा चेहरा मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे उध्दव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातूनच ते वायफळ बडबड करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून आमदार बनून दाखवावे व त्यानंतरच असे आरोप करावे असे थेट आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसाच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवारी राजुरा व चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ब्रम्हपुरी व चिमूरच्या दिशेने निघण्यापूर्वी स्थानिक हॉटेल एन. डी. येथे पत्रकार परिषद उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे यांचा विदर्भ दौरा हा वैफल्यग्रस्ततेतून होता.
“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन
अडीच वर्षाचा एकूणच कारभार बघता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांचा चेहरा मान्य करायला तयार नाहीत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-09-2024 at 13:38 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar BawankuleनागपूरNagpurभारतीय जनता पार्टीBJP
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president mla chandrasekhar bawankule appeal to uddhav thackeray regarding election rsj 74 amy