नागपूर : पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा रविवारी दोन ठिकाणी ‘रोड-शो’ झाला. प्रियंका गांधी यांची एक झलक बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तब्बल चार प्रतीक्षा केली. मात्र, या ‘रोड शो’साठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही तब्बल चार तास प्रतीक्षा केली आहे. ऐकून आश्चर्य वाटत असले तरी हे खरे आहे. याचे कारण काय हे सविस्तर जाणून घेऊया.

संघ परिसरात ‘रोड शो’

काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याकडून अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली जाते. रविवारी संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात प्रियंका गांधी यांनी ‘रोड शो’ केला. या भागात ‘रोड शो’ होणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राग होता. काँग्रेसकडून कायम संघावर टीका होत असल्याने हा विरोध करण्यात आला. महालच्या गांधी गेट समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’ला सुरुवात झाली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महाल, गांधी गेट चौक ते कोतवाली पोलीस ठाणे मार्गे बडकस चौकापर्यंत ‘रोड शो’ होता. बडकस चौकामध्ये मोठा हार घालून प्रियंका गांधी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बडकस चौकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना भाजपचे झेंडे दाखवत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. प्रियंका गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांना बघून टाळ्या वाजवल्या. झेंड दाखवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, महाराष्ट्रात यावेळी विजय महाविकास आघाडीचाच होणार अशा घोषणा दिल्या.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sharad Pawar appreciate Rss work , Sharad Pawar,
संघाच्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
Many youths participated in the Wardha bodybuilding competition
शरीर सौष्ठव स्पर्धेत ‘ यांनी ‘ मारली बाजी, पिळदार शरीराचे दमदार प्रदर्शन.
Gulabrao Deokar , BJP, Ajit Pawar group, Ajit Pawar ,
गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध

हेही वाचा…नाना पटोले हे स्वयंघोषित मुख्यमंत्री, खासदार प्रफुल पटेल

u

प्रियंका गांधीनी दिल्या भाजपला शुभेच्छा

प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’च्या मार्गातील रस्ते छोटे असतानाही प्रियंका गांधींना एकदा प्रत्यक्ष बघता यावे म्हणून नारिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. रस्त्यात उभे असलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’ संपल्यावरही बडकस चौकात हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपचे झेंडे दाखवत घोषणा दिल्या. यावर मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी तब्बल चार तासांपासून भाजपचे कार्यकर्ते थांबून होते, यासाठी आभार मानत टीका केली. तसेच तुम्हाला दोन रंग हवे आहेत की तिरंगा हवा? असा प्रश्नही केला. यामुळे परिसरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

Story img Loader