लोकसत्ता टीम

वर्धा : उमेदवारीपूर्व मेळावा घेण्याची घोषणा आमदार दादाराव केचे यांनी केली अन् भाजप ज्येष्ठ हडबडून गेले. त्यावेळी आर्वी मतदारसंघसाठी अधिकृत उमेदवार भाजपने जाहीर केला नव्हता. पण केचे हे परतीचे दोर कापून बंडखोरी करू शकतात हे हेरून हालचाली झाल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केचेंना भेटीस बोलावले. भेट झाली आणि केचे म्हणाले की फडणवीस यांनी सगळे काही व्यवस्थित होईल, तू पहिले मेळावा रद्द कर, व तसा जाहीर मेसेज मला वॉट्सअप कर, असे सांगितल्याचे केचे म्हणाले. केचेंनी तसेच केलेही. विशेष म्हणजे केचे या घडामोडी पत्रकारांसोबत शेअर पण लगेच करीत. म्हणजे भाजप कर्त्याधर्त्यांनी गोपनीय केलेली चर्चा सार्वजनिक करीत केचे दबावाचे राजकारण करीत असल्याचे दिसून येत होते. पण केचे शांत होणारच, अशी खात्री भाजप वर्तुळ देत होतेच. त्यामागचे कारण एका वरिष्ठ नेत्याने उलगडले.

maharashtra vidhan sabha election 2024 bjp candidate sumit wankhede contest polls from arvi assembly constituency
Bjp Candidate In Arvi Assembly Constituency : भाजपचा राज्यातील सर्वात ‘लाडका’ उमेदवार, त्याच्यासाठी वाट्टेल ते
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
Maharashtra assembly election 2024 BJP rebel Dadarao Keche moved out of Maharashtra
आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे हे पत्नी मयुरा काळे हिलाच उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेसकडे हट्ट धरून बसले असल्याची बाब एव्हाना सार्वजनिक झाली होती. पत्नीसाठी उमेदवारी त्यांनी खेचून आणताच भाजप वर्तुळणे मग केचेंवर अधिक फोकस केला. केचे यांच्या उमेदवारीपेक्षा सुमित वानखेडे यांचे असणे यामागे असलेले सूत्र अधिक प्रभावी ठरले. विद्यमान आमदार बदलून नवा उमेदवार दिल्यास फायदा होण्याची शक्यता अधिक. त्यातच खासदार काळे यांचे नॉट रिचेबल प्रकरण नाराजीचे कारण ठरत असल्याची चर्चा. परत अन्य निष्ठावंत नेत्यांना डावलून पत्नीसाठी त्यांनी आणलेली उमेदवारी भाजपसाठी विजयाची संधी ठरू शकते म्हणून मग नवा उमेदवार देत केचे यांना येणकेन प्रकार घरी बसविण्याचे डाव प्रभावी करण्यात आले, असे म्हटल्या जाते.

आणखी वाचा-विदर्भात मतविभाजनासाठी ‘उदंड झाले अपक्ष’; ‘हरियाणा पॅटर्न’ची चर्चा

लोकसभा निवडणुकीत खासदार पराभूत झाल्याने नवा गडी द्यायचे पक्के झालेच होते. खासदार तडस यांना बदलून सागर मेघे यांना उमेदवारी दिली असती तर वेगळा निकाल दिसला असता, असा सूर काहींनी काढला. केचे म्हणत की जे मला देण्याचे आश्वासन तुम्ही देता तेच त्याला ( वानखेडे ) का देत नाही. पण केचे बदलून आर्वीत नवा गडी देण्याचा डाव खूप पूर्वी आकारास येत होता. मी उमेदवार, असा चकार शब्द वानखेडे यांनी कधी काढला नव्हता. भाजपचा लोकसभेत पराभव झाला आणि वानखेडेच लढणार हे पक्के झाले.

आणखी वाचा-अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांसमोर अनामत रक्कम वाचविण्याचे मोठे आव्हान

आघाडीने उमेदवार बदलला, आपणही बदलू, अशी रणनीती पक्की झाली. त्यातच खासदार पत्नीचा पराभव करण्याचे टार्गेट पूर्ण करण्यास काही भाजप विरोधी पण मदत करतील, हे गृहीत धरण्यात आले. आयुष्यात प्रथमच चार्टर विमानात बसून थेट अमित शहा यांच्या भेटीला जाण्याचा योग केचेंना फळला. अन्यथा मोदी यांच्या सभेत मागच्या रांगेत गेलेल्या केचेंना शहा यांच्या दिवाणखान्यात बसण्याची संधी कधीच मिळाली नसती.