नागपूर : वन्यप्राणी आणि पक्ष्यांची ओळख त्यांच्या रंगावरुन लगेच  कळते. मात्र, काही जनुकीय बदलांमुळे प्राण्यांची कातडी थोड्याफार प्रमाणात रंग बदलते. ही सामान्य प्रक्रिया असली तरीही ‘अल्बिनो’ आणि ‘मेलॅनिस्टिक’ अशा दोनच संकल्पना माहिती आहेत. पेंच व्याघ्रप्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांचे प्राण्यांमधील रंगद्रव्यांची संकल्पना सांगणारे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲडव्हान्स रिसर्च’ मध्ये प्रकाशित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेलॅनिन हे सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारे मुख्य रंगद्रव्य आहे, जे केस आणि फर यांच्या रंगासाठी जबाबदार आहे. मेलॅनिनचे युमेलॅनिन आणि फेओमेलॅनिन हे प्रकार आहेत. ते काळ्या ते वालुकामय आणि वालुकामय ते लाल रंगांच्या वेगवेगळ्या संयोजनामध्ये एक प्रचंड रंगश्रेणी तयार करतात. मेलॅनिनचा विकास हा मेलॅनिन संश्लेषण नावाच्या जैवरासायनिक प्रक्रियेवर अवलंबून असतो, तो कोणत्याही त्रासामुळे किंवा अनुवंशिक उत्परिवर्तनाने प्रभावित होतो. म्हणजे मेलॅनिन संश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यावर मेलॅनिनच्या एकाग्रतेवर आणि वितरणावर परिणाम होतो. परिणामी रंग खराब होतो. सस्तन प्राण्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण त्वचार फार किंवा केसांनी परिधान केलेली असते आणि ती रंगामुळे प्रभावित होऊ शकते. साधारणपणे रंगातील बदल आसपासच्या हंगामी हवामान परिस्थितीवर आणि ते जेथे आढळतात, त्या भौगोलिक प्रदेशावर अवलंबून असते. याशिवाय वय, लिंग, आरोग्य आणि पोषण हे प्राण्यांच्या दिसण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे या संशोधनात म्हटले आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पात नियमित गस्तीदरम्यान सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांना पांढऱ्या रंगाचे सांबर हरिण, मानेच्या भागावर अर्धवट पांढरा रंग असलेले चितळ हरीण आणि नेहमीपेक्षा अधिक काळसर रंगाचे चितळ दिसून आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black deer white sambar deer at the pench tiger project zws
First published on: 25-05-2022 at 21:15 IST