भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

महिलेच्या तक्रारीवरून या भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला आहे.

Crime-News
(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर :  मौदा चिरव्हा येथे एक व्यक्ती मुलबाळ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध देत असल्याचे कळल्यावर चंद्रपूरची महिला तेथे गेली. परंतु या भोंदूबाबाने तुझ्यात भूत असल्याचे सांगत  तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून या भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला आहे.

शिवराम संपतराव राजगिरे (६५) रा. चिरव्हा असे आरोपीचे नाव आहे. ते मुलबाळ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध देत असल्याची माहिती या चंद्रपूरच्या महिलेला कळली. तिलाही काही वर्षांपासून मुलबाळ होत नसल्याने ती हा बाबा राहत असलेल्या मौदा चिरव्हा येथे  २०१६ मध्ये गेली. बाबाने महिलेला एका खोलीत नेऊन प्रसाद दिला. त्यानंतर महिलेमध्ये भूत असल्याचे सांगत  बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणाला काही सांगितल्यास  जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो सातत्याने महिलेवर  बलात्कार करत होता. त्रास असह्य़ झाल्यावर महिलेने शेवटी मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर भोंदूबाबावर  गुन्हा दाखल करण्यात आला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Black magician crime nagpur news ayurvedic medicine akp

ताज्या बातम्या