लोकसत्ता टीम
वर्धा: पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बेमालूमपणे चलनात आणणाऱ्या चार युवकांच्या टोळीस अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. चौघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील व ग्रामीण भागातील असल्याने पोलीसही अवाक झाले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
आणखी वाचा- चालकाला डुलकी अन् उड्डाणपुलावरून ट्रक थेट घरावर…
प्रीतम प्रदीप हिवरे, स्वप्नील किशोर उमाटे, साहिल नवनीत साखरकर, सर्व पवनार व निखिल आशिष लोणारे रा. श्रीराम टाऊन, वर्धा अशी आरोपींची नावे असून सर्व वीस ते बावीस वयोगटातील आहेत. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या १८८ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा दिल्ली येथून येत असल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत सध्या सविस्तर माहिती देणे शक्य नसल्याचे गुन्हा शाखेने स्पष्ट केले.
काही दिवसांपासून पान टपरी, पेट्रोल पंप व किरकोळ बाजारात बनावट नोटा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलीस मागावर होतेच. सखोल तपास करण्यासाठी खास चमू तयार करण्यात आली. त्यांना ही टोळी रात्री गवसली. तिघांना पवनार व एकास मदनी गावातून अटक करण्यात आली आहे.