scorecardresearch

नागपूर : मेयो, प्रादेशिक मनोरुग्णालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता एका अज्ञात युवकाने फोन करत बॉम्बस्फोट करत धमकी दिली होती

bomb-explosion threat
बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर रुग्णालयात वाढवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त

नागपूर शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) मध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा फोन पोलिसांच्या ११२ वर आला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली.

हेही वाचा- नागपुरातील व्यापाऱ्यांची शेअर्स ट्रेडिंगमध्ये २० कोटींनी फसवणूक

पोलिसांचे बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस), श्वानपथकासह मोठा ताफा दोन्ही ठिकाणी रवाना करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता हा फोन एका अज्ञात युवकाने केला होता. मात्र, पोलिसांनी धमकीच्या फोनला गांभीर्याने घेत तपास सुरु केला. फोन करणाऱ्याचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी मेयो रुग्णालयात अचानक बंदोबस्त वाढवला आणि शोधाशोध सुरु केली.

हेही वाचा- चंद्रपूर : विद्युत प्रवाहाचा स्पर्श की शिकार? नांदगाव येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू

अनेकांनी धोका ओळखून सावध पवित्रा घेत पळ काढला. श्वान पथक आणि बीडीडीएस पथकाने मेयो आणि प्रादेशिक रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 09:18 IST