वर्धा, जंगलातील शिकार थेट बघायला मिळणे म्हणजे उत्कट क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभणे होय. एकदा भक्ष्य पकडून त्यास मारल्यानंतर त्यावर ताव मारत असलेला वाघ अनेकांनी पाहला असेल. पण मोठे धूड असलेले जनावर अडविणे, त्यास वाघीण व तिच्या पिल्लांनी घेरणे, आणि जनावर हंबरडा फोडत सुटकेचा करीत असलेला प्रयत्न हाणून पाडणे, असे दृष्य विरळाच. यात ती वाघीण आपल्या तीनही पिल्लांना सोबत घेत शिकवीत असलेले शिकार ( Hunting ) करण्याचे तंत्र अफलातून म्हणावे. तेच टिपले बोरच्या वन अधिकाऱ्यांनी.
Catrina व Pinki
बोर व्याघ्र प्रकल्पत आता व्याघ्र वंश विस्तारतोय. या जंगलाची महाराणी म्हणून Catrina वाघीण आहेच. तिचे अधिराज्य बोरच्या कोअर क्षेत्रात. सध्या ती दोन युवराजसह वावरत आहे. दोन दिवसापूर्वीच या तिघांचे दर्शन कृत्रिम पाणवठ्यावर झाले. तो vidio लोकसत्ता ऑनलाईन मधून आल्यावर चांगलीच चर्चा झाली. याखेरीज राहटी गेट व परिसर हे मोठे क्षेत्र आहे. तिथे पिंकी व तिच्या बछड्याचा संचार आहे. हा परिसर नागपूरलगत म्हणून राहटी प्रवेशद्वार नव्याने सूरू करण्यात आले.
नवे राज्य ढगा
राहटी सोबतच ढगा हे नवे प्रवेशद्वार पण सूरू करण्यात आले होते. या दाट जंगलात महादेवाचे प्राचीन मंदिर असून महाशिवरात्रीस या ठिकाणी भव्य यात्रा भरत असते. याच जंगल भागात व्याघ्र परिवार आहे. वाघीण व तिचे ७ महिन्याचे तीन बछडे ईथे दरारा राखून आहे. त्यांचा हा थरार. वाघीण T – 13 म्हणून वन खात्यात ओळखल्या जाते. पण तिचे ईथे अधिराज्य म्हणून ढग्याची राणी अशी तिची चर्चा होते. तसेच ढग्याची पार्वतीबाई असेही काही म्हणतात.
Live Hunting
याच ढग्याच्या राणीच्या शिकारीचा थरार वन अधिकाऱ्यांनी टिपला आहे. पार्वतीबाई व तिची तीन पिल्लं शिकार शोधत असतांना जंगलात चरत असलेली नीलगाय म्हणजेच रोही हा प्राणी दिसला. चौघानी मिळून या नीलगायीस घेरले. आंत ओढत नेले. सर्व त्या मोठ्या धुडावर अक्षरशः तुटून पडले. नीलगाय तावडीतून सुटण्याच्या आटोकाट प्रयत्नात पण वाघीण सर्व ती ताकद लावत खेचते. बच्चे कंपनी आईस मदत करीत सावज सुटू नये म्हणून हल्ला चढवितात. त्याच दरम्यान वन खात्याच्या गाडीचा आवाज आला म्हणून ते बिचकत पळ काढण्याचा प्रयत्न पण करतात. पण भरल्या ताटावरून उठू नये, अशी जणू आई पार्वतीबाई हिची शिकवण. आई सावज शिकार सोडायला तयार नाही हे पाहून बच्चे परत हल्ला बोल करतात. अखेर तिघेही सावज टिपण्यात यशस्वी होतात. ही दुर्मिळ अशी झटापट व जिवंत शिकार बघायला मिळणे दुर्मिळ बाब म्हटल्या जाते. ती कॅमेराकैद झाली. हा खास vidio लोकसत्ता online साठी उपलब्ध झाला आहे.
