प्रस्तावित खामगाव-जालना रेल्वे मार्गावरून अलीकडे रणकंदन माजले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मार्गासह अन्य मार्गांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शनिवारी रेल्वे, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीस्थित दूरसंचार भवन येथे भेट घेतली. यावेळी खासदारांनी त्यांच्या समवेत विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी ना. वैष्णव यांनी आगामी अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित खामगाव-जालना तसेच अकोला-अकोट-हिवरखेड-संग्रामपुर-खंडवा या रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतुद करण्याची ग्वाही दिली. शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्यांच्या सुविधेसाठी शेगाव रेल्वे स्थानकावर न थांबणाऱ्या रेल्वेगाडीचे थांबे मंजूर करण्यासंदर्भातील निवेदन खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिले.

हेही वाचा >>>नागपूर : दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी तरूण दाम्पत्याने ट्रकला हात दाखवला , पुढे घडले असे की…

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

शेगाव रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यातून जाणाऱ्या मलकापूर-नांदुरा-जलंब रेल्वे स्थानकावरही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सुविधेसाठी ‘टेंम्पल टू टेम्पल’ नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यासंदर्भात ना. वैष्णव यांनी सकारात्मकता दर्शविली.

हेही वाचा >>>अमरावतीत दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना, चौघांचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा
बिएसएनएलची सेवा सुधारून ‘भारत नेट’अंतर्गत बळकटीकरण करून ग्रामीण भागांत इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याची बाब खा. जाधव यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबधित विभागाला दिल्या.