scorecardresearch

बुलढाणा: प्रसाद लाड यांना शिवरायांनी सुद्बुद्धी द्यावी; केळवदवासीयांची प्रार्थना

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचे सांगणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना जिल्ह्यातील केळवद (ता. चिखली) येथील गावकऱ्यांनी केली.

बुलढाणा: प्रसाद लाड यांना शिवरायांनी सुद्बुद्धी द्यावी; केळवदवासीयांची प्रार्थना
प्रसाद लाड यांना शिवरायांनी सुद्बुद्धी द्यावी; केळवदवासीयांची प्रार्थना

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचे सांगणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना जिल्ह्यातील केळवद (ता. चिखली) येथील गावकऱ्यांनी केली. या अभिनव निषेधरूपी प्रार्थनेची खमंग चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व प्रवक्ते त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानाचा धुरडा खाली बसायला तयार नसताना आ. लाड यांनी जावईशोध लावला. यामुळे सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या केळवद गावातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे ‘प्रार्थना आंदोलन’ केले. आमदार लाडसारख्या ‘ज्ञानी’ नेत्यांना शिवरायांनीच सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 20:03 IST

संबंधित बातम्या