बुलढाणा: देशात आणि महाराष्ट्र राज्यात जीबीएसचा वेगाने प्रसार होत असून त्याचा धोका वाढला आहे. हा आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याचे स्पष्ट झाले तर आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असे सुतोवाच देशाचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी येथे केले .

नामदार प्रतापराव जाधव काल सोमवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय मधील आपल्या संपर्क कार्यालयात प्रसिद्धि माध्यम प्रतिनिधि समवेत संवाद साधला. यावेळी जीबीएस च्या वाढत्या धोक्या संदर्भात विचारणा करण्यात आली असता त्यांनी वरील प्रमाणे सुतोवाच केले . देशात आणि महाराष्ट्र राज्यात या आजाराचा, प्रसार आणि धोका वाढला असून रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. या आजाराची लागन, गर्दी आणि संसर्ग मुळे होत असल्याचे आढळून आल्यास यात्रा वर निर्बंध संदर्भात नक्कीच विचार करू असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय आरोग्य विभाग आणि यंत्रणा या आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील आजाराचा मुकाबला करण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘ शिंदे गट भाजपात विलीन होईल’ या शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांच्या भाकिताची त्यांनी खिल्ली उड़विली. यासंदर्भात विचारणा केली असता नामदार जाधव म्हणाले की, संजय राऊत यांनी त्यांचा उबाठा गट सांभाळावा. आज घडिला दररोज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते व कार्यकर्ते आमच्यात (शिवसेना शिंदे गट मध्ये) सामील होत आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली व सरकत आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जहाल हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्यासाठी आणि त्याचा प्रसार ,प्रचार करण्यासाठी आमचे नेते आणि राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णपणे सक्षम आहे. राउत यांनी त्यांच्या शिवसेनेच बघाव, असा परखड़ सल्ला त्यानी यावेळी दिला. शेतकरी सोयाबीन आणि कापूस खरेदी संदर्भात विचारणा केली असता, एकाही शेतकऱ्याचा सोयाबीन आम्ही घरात ठेवणार नाही, अशी ग्वाही जाधव यांनी दिली. कापसाच्या भावाबद्दलही लवकरच मी कृषीमंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा व खचून जाऊ नये, असा दिलासा त्यांनी दिला.