बुलढाणा : चिखली तालुक्यातील एका गावात जेमतेम १२ वर्षे ४ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने तीला गर्भधारणा झाल्याचे तपासणीत आढळून आले.
दरम्यान नको त्या वयात तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधम युवकांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर शेषराव सुरडकर (वय २२, राहणार डोंगर खंडाळा, तालुका व जिल्हा बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. मागील १५ जून २०२५ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हा घृणास्पद घटनाक्रम घडला. आरोपीने पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे पुढे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे पुढे स्पष्ट झाले. दरम्यान, पीडितेला पोटदुखीची तक्रार जाणवल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. वैद्यकीय तपासणीत मुलीला गर्भधारणा झाल्याचे समोर आल्यावर तिच्या आईला जबर मानसिक धक्का बसला . त्यानंतर मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा नोंदविण्यास झालेला विलंब हा गर्भधारणा उघड झाल्यानंतरच प्रकार समोर आल्यामुळे झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एफ ), ६४(२)(एच ), ६४(२) (१), ६४(२) (एम ), ६५(२) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ मधील कलम ६, १०व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे करीत आहे.संबंधिताविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
