बुलढाणा : बुलढाणा तालुक्यात अजिंठा पर्वतरांगा आहेत. या अजिंठा पर्वतावर गिरडा हे गाव वसले आहे. गावाला वेढा घातलेल्या दाट आणि विस्तीर्ण जंगलात बिबट, अस्वल, सारख्या वन्य प्राण्यांचे गावकऱ्यांना नेहमीच दर्शन होते. यामुळे रात्री उशिरा शेताकडे वा दूर जाण्याचे गावकरी कटाक्षाने टाळतात.

गिरडा वन वर्तुळात घनदाट जंगल, गर्द झुडुपे, नाले आदी पाण्याचे जलस्रोत, दऱ्याखोऱ्यात लपण्यासाठी कपारी, उपलब्ध असलेल्या ‘शिकार’, मानवी वस्त्यामुळे उपलब्ध असलेली पाळीव जनावरे, अनुकूल भौगोलिक परिस्थिती आदी विविध कारणांमुळे गिरडा ‘सर्कल’मध्ये बिबट्यांची संख्या आणि वावर वाढला आहे.

buldhana person drowned
बुलढाणा: चौथ्या दिवशी सापडला एकाचा मृतदेह; दोघे बापलेक मात्र बेपत्ताच
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
illegal weapons smuggling in border areas of Buldhana district and Madhya Pradesh
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शस्त्र तस्करी उघड
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Gadchiroli forest officer arrested for accepting 2 lakh bribe
गडचिरोलीत ६६ लाखांची अपसंपदा जमविणाऱ्या, पालघरच्या ‘आरएफओ’वर गुन्हा, पत्नीही आरोपी
running nilgai hit thee vehicles on buldhana chikhli highway
बुलढाणा :’तो’ सुसाट वेगाने धावत सुटला.. तीन वाहनांना उडविले अन् स्वतः जायबंदी झाला..
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
chandrapur Tiger
चंद्रपूर: पाच गुराख्यांचा बळी घेतला, अखेर शार्प शुटरने पहाटेच…

हेही वाचा – वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?

बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गिरडा वन वर्तुळात बिबट्यांचा वावर वाढला आहे. अलीकडच्या एका घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात युवा शेतकरी मृत्युमुखी पडल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. यामुळे विविध उपाययोजना करण्यात येत असून पाच बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. आज गुरुवारी एका मादी बिबटला पकडण्यात आले असून तिची नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

मानवी वस्त्या विस्तारल्या की संघर्ष वाढतो. यातूनच वन्यजीव आणि मानवी संघर्षांच्या घटना गिरडा परिसरात अधूनमधून घडतात. शेतकऱ्यांच्या पशू धनावर हल्ल्याच्या तुरळक घटना घडल्या. मात्र, मर्यादेत असलेल्या वन्यजीव आणि मानवी संघर्ष गत ऑगस्ट महिन्यात भीषण झाला.

मागील २९ ऑगस्ट २०२४ रोजी भरदिवसा दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुभाष जाधव हा युवा शेतकरी ठार झाला होता. तो आपल्या जंगलाला लागून असलेल्या शेतात कामासाठी आला होता. त्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याने जंगलापर्यंत फरफटत नेले होते. त्याचा अकाली मृत्यू झाला. गिरडा परिसरासह पंचक्रोशीतील हजारो नागरिक व शेतकरी या घटनेमुळे भयभीत झाले होते.

वन विभाग ॲक्शन मोडवर

या गंभीर घटनेमुळे अधिक सतर्क झालेल्या वन विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. गिरडा गावाजवळ २ पिंजरे लावून वन कर्मचाऱ्यांची ३ पथके स्थापन करण्यात आली. गावकऱ्यांमध्ये जागृती करत वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली होती. वनविभागाने लावलेल्या या पिंजऱ्यात आज गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी एक मादी बिबट अडकली! या बिबटला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे रवाना करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ‘एसीएफ’ अश्विनी आपेट यांनी दिली आहे.

अंबाबारवा अभयारण्यात सोडले

आज अखेर बुलढाणा वन विभागाने गिरडा परिसरातून एकूण पाच बिबट्यांना जेरबंद केले आहे. यापैकी ३ बिबट मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्यात सोडण्यात आले. उर्वरित दोघा बिबट्यांना नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सोडले. यामुळे गिरडावासी भयमुक्त झाले आहे.

हेही वाचा – साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव

वन विभागाला गिरडावासीयांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे ५ बिबट्यांना सुरक्षितरित्या पकडून इतरत्र हलविले आहे. उपवनसंरक्षक सरोज गवस, एसीएफ अश्विनी आपेट, बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. डी. वानखेडे, वनरक्षक प्रदीप मुंडे तसेच वनकर्मचारी यांनी ही कामगिरी बजावली आहे.