बुलढाणा : आज मंगळवारी, (१४ जानेवारी) मकार संक्रांती निमित्त नांदुरा शहरात पतंग उडविणाऱ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. मात्र, नायलॉन मांजामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून गेल्याने नांदुरा शहरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. यामुळे शेकडो नागरिकांची गैरसोय झाली.

पतंगच्या मांजामुळे काही ठिकाणी विजेचे तार तुटले, त्यामुळे नांदुरा शहरातीलअनेक भागातील वीज पुरवठा बंद पडला. हा वीज पुरवठा सुरळीत व्हायला रात्र लागू शकते अशी चिन्हे आहे. काही भागातील नागरिकांना रात्रं अंधारातच काढावी लागण्याची शक्यता आहे. महावितरणचे शहर अभियंता जयस्वाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तार तुटल्याचे मान्य करून लवकरच विद्युत पुरवठा सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा…चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…

नायलॉन मांजामुळे अलीकडे म्हणजे एका व्यक्तीचा गळा चिरला गेला होता. मात्र, यंत्रणांनी कडक कारवाई केली नाही. थातुरमातुर कारवाई केली. त्यामुळे विक्रेत्यांचे मनोधैर्य वाढले. यापरिणामी संक्रात निमित्त शहरात नायलॉन मांज्याची मोठ्या प्रमाणात सर्रास विक्री झाली. एवढेच नव्हे नायलॉन मांज्याचे दर कैक पटीने वाढवून तसेच पतंगाचे दर पाचपटीने वाढवून आज चढ्या भावात नायलॉन मांजा व पतंगाची विक्री केली.

नांदुरा पोलिसांनी एकदाच कारवाई केल्यानंतर दिरंगाई केली. त्यामुळे पतंग व मांजा विक्रेते दुकानदारांना आता कोणाची भीती राहिली म्हणून सर्रासपणे मांज्याचीची विक्री नांदुरा शहरात सुरू होती. त्या मांज्यामुळे विद्युत तारा तुटून पडल्याने अनेक घरातील मीटरही बिघडले. नांदुरा खुर्द परिसरात पंधरा ते वीस घरातील मीटर जळून गेले रात्री उशिरापर्यंत त्या भागातील वीज पुरवठा सुरु झाले नसल्याचे दिसून आले. नांदुरा पोलिसांनी नायलॉन मांजा पकडण्याकरता कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Story img Loader