Buldhana Punishment fine within 24 hours after action Hotel owner alcoholics ysh 95 | Loksatta

बुलढाणा : कारवाईनंतर २४ तासातच दंडाची शिक्षा; हॉटेल्स चालक व मद्यपींना मद्यपान पडले महागात

कारवाईनंतर अवघ्या २४ तासातच आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका कारवाईनंतर हा सुखद चमत्कार घडला.

बुलढाणा : कारवाईनंतर २४ तासातच दंडाची शिक्षा; हॉटेल्स चालक व मद्यपींना मद्यपान पडले महागात
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

बुलढाणा: कारवाईनंतर अवघ्या २४ तासातच आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका कारवाईनंतर हा सुखद चमत्कार घडला. प्रभारी अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जी .आर. गावंडे, किशोर पाटील, आर.आर. उरकुडे, एस.डी. चव्हाण यांनी ३० सप्टेंबरला राज्यमार्गावरील परवाना नसताना मद्यपानाची मुभा देणाऱ्या हॉटेल्स चालक व त्याठिकाणी मद्यपान करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई केली. चिखली, मेहकर परिसरातील काकाजी ढाबा, श्रीयोग, विघ्नहर्ता, अन्नदाता या हॉटेल्समध्ये ही कारवाई करून मद्यपान करणाऱ्या ग्राहकांना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर २४ तासातच तपास करून चिखली न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> नागपूर : काँग्रेसमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हावे; काँग्रेस नेते शशी थरूर यांची अपेक्षा

दरम्यान, न्याय दंडाधिकारी एच. डी. देशींगे यांनी ५ मद्यपींना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा तर हॉटेल्स चालकांना प्रत्येकी ४० हजारांचा दंड सुनावला. दोन्ही मिळून दंडाची रक्कम १ लाख ५ हजार इतकी आहे. ही जलदगती कारवाई व न्यायदान कौतुकाचा विषय ठरला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर : सांस्कृतिक महोत्सवाच्या ज्येष्ठ नागरिक महोत्सव घेणार; नितीन गडकरी यांची घोषणा

संबंधित बातम्या

“माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे…”, पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य
टायर फुटल्याने चारचाकी झाडाला धडकली; यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा यांचा मृत्यू
नागपूर: प्राथमिक फेरीत रंगमंचावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनय
पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भाशी भाजपचा दुजाभाव
अमरावतीतील पवन नालट यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द