scorecardresearch

बुलढाणा : ‘स्कायमेट’चा अंदाज आता शेतकऱ्यांना समजणार नसल्याने रविकांत तुपकरांची सरकारवर टीका

केवळ विमा कंपन्यांचे भले करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचेही म्हणाले आहेत

बुलढाणा : ‘स्कायमेट’चा अंदाज आता शेतकऱ्यांना समजणार नसल्याने रविकांत तुपकरांची सरकारवर टीका

“राज्यातील लाखो शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे ‘स्कायमेट’ या हवामानविषयक संस्थेचे अंदाज शेतकऱ्यांना मिळणे बंद होणार असून, केवळ शासनालाच ही माहिती दिली जाणार आहे.”, असा गौप्यस्फोट ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. “हा निर्णय शेतकरीविरोधी असून केवळ विमा कंपन्यांचे भले करण्यासाठीच तो घेण्यात आला.”, असा आरोप तुपकरांनी केला आहे.

‘स्कायमेट’ कंपनी आणि राज्य सरकारमध्ये करार झाला होता. त्यामुळे २०१८ ते आतापर्यंत शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती मिळत होती. यावरून शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याकडे तक्रार करणे शक्य व्हायचे. मात्र, आता पर्जन्यमानाचे अंदाज मिळणे बंद झाल्याने शेतकरी तक्रार करणार तरी कशी? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातून कृषी निर्यात २२ टक्क्यांनी वाढली; द्राक्षे आणि केळीचा वाटा सर्वाधिक

कंपन्यांशी साटेलोटे करीत खिसे भरण्याची ही नवी योजना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध असून सरकारने हा मनमर्जी निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Buldhana ravikant tupkar criticizes the government as farmers will not understand the forecast of skymet msr

ताज्या बातम्या