scorecardresearch

बुलढाणा : करोनाच्या संकट परतून लावल्यानंतर महिला रुग्णालय स्त्री-रुग्णांच्या सेवेत

करोनाच्या महामारीत बुलढाणा-औरंगाबाद महामार्गावर २१ कोटी खर्चून उभारण्यात आलेले महिला रुग्णालय वरदान ठरले.

बुलढाणा : करोनाच्या संकट परतून लावल्यानंतर महिला रुग्णालय स्त्री-रुग्णांच्या सेवेत
बुलढाणा : करोनाच्या संकट परतून लावल्यानंतर महिला रुग्णालय स्त्री-रुग्णांच्या सेवेत

करोनाच्या महामारीत बुलढाणा-औरंगाबाद महामार्गावर २१ कोटी खर्चून उभारण्यात आलेले महिला रुग्णालय वरदान ठरले. दोन वर्षे या महासंकटाचा सामना करून करोनाला परतवून लावणारे हे शासकीय रुग्णालय सोमवारी खऱ्या अर्थाने महिला रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. नारी शक्तीचे प्रतीक असलेल्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर व मान्यवर नेते, अधिकाऱ्यांच्या साक्षीने या रुग्णालयाचे एका महिला अधिकाऱ्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा >>> नागपूर : ब्रम्हपुरीतील मुलीवर बलात्कार प्रकरणात आणखी ५ आरोपी , राजकीय नेत्यांचाही समावेश

खासदार प्रतावराव जाधव, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांना देण्यात आला. शासनाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडला. दरम्यान, एक महिना बाह्यरुग्ण तपासणी विभाग सुरू राहणार असून त्यानंतर अद्ययावत सुविधा सुरू करणार असल्याचे डॉ. सचिन वासेकर यांनी सांगितले. या रुग्णालयासाठी तत्कालीन आमदार विजयराज शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या