नागपूर: प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी नितीन साळवे हे सराफा व्यापारी पोहोचले. त्याने पटोले यांचे स्वीय सहाय्यक उमेश डांगे यांनी फसवणूक केल्याची तक्रार केली.

सराफा असोसिएशनने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. नाना पटोले यांना निमंत्रण देण्यात आले होते. पण वेळ देऊनही पटोले कार्यक्रमाला आले नाही, यासाठी उमेश डांगे जबाबदार आहेत. असा आरोप आरोप नितीन साळवे यांनी केला.

Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

आणखी वाचा- “मोदी, फडणवीस यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी”; ईडी कारवाईवरून पटोलेंची टीका

कार्यक्रमाची पत्रिका छापण्यापासून ते पोस्टर्स, बॅनर्स लावल्याचीही माहिती उमेश डांगें यांना दिली. नाना पटोले येतील, असेही डांगेंनी मला सांगितले होते. पण नंतर नंतर ते मला टाळू लागले. माझा कॉल घेत नव्हते, भेटत नव्हते. त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पटोले कार्यक्रमाला येतील, असे समजून आम्ही पूर्ण तयारी केली. पण केवळ या उमेश डांगेंमुळे पटोले आले नाही, असा आरोप साळवे यांनी केला.

आणखी वाचा- कापसाच्या भावात अस्थिरता; उत्पादक शेतकरी संभ्रमात

साळवे यांनी उमेश डांगे यांच्यावर रोष व्यक्त केल्यावर नाना पटोलेंची भेट घेतली. ‘पोट निवडणूक असल्यामुळे मला ऐन वेळेवर तिकडे जावे लागले. त्यामुळे मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.’, असे नाना पटोलेंनी सांगितल्याचे साळवे म्हणाले.